मालमत्ता नोंदणी खरेदी बंदच्या आदेशास १४ पर्यंत मुदतवाढ


अकोला,दि.३१ (जिमाका)-जिल्ह्यातील मालमत्तांच्या खरेदी विक्री व नोंदणी व्यवहार  बंद ठेवण्याच्या आदेशास येत्या १४ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुदतवाढ दिली आहे. या संदर्भात दि.२३ रोजी  जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २, ३ व ४   अन्वये  जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयात होणारे मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार व नोंदणी ही ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर हे आदेश देण्यात आले होते. मालमत्ता खरेदी विक्री नोंदणीचे व्यवहार हे बायोमेट्रीक पद्धतीने होत असल्याने व मालमत्ता खरेदी विक्रीसाठी बाहेरगावाहून लोकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात होते.  देशात १४ एप्रिल पर्यंत लॉक डाऊन असल्याने या आदेशास मुदतवाढ देण्यात आली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ