महात्मा फुले कर्जमुक्ती योजना तक्रारीचे निरासरण त्वरीत करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश



अकोला,दि.6 (जिमाका)-   महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेतंर्गत आज पर्यंत  1030 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या तक्रारीमध्ये आधारक्रमांक चुकीचा असणे , शेतक-यांना कर्ज मुक्तीची रक्कम अमान्य असणे , अंगठा न जुळणे तसेच काही शेतकरी  मुत्यू झाला असल्यामुळे कर्ज मुक्ती न होणे आदिंचा समावेश आहे.  अशा तक्रारींचे त्वरीत निरासराण करण्यासाठी लागणारे कागदपत्रे बँकांनी  त्वरीत  उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे जमा करावे असे निर्देश जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी दिलेत.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजना या  विषयाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने   बँकांचे अधिकारी यांची आढावा बैठक  घेण्यात आली. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अलोक ताराणीया, सहकारी संस्थेचे उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्‍या शेतक-यांची तक्रार आहे अशा शेतक-यांकडून लिखीत स्वरूपात  तक्रार बँकांनी स्वीकारावी तसेच  बॅकांनी  तक्रारीवर केलेल्या कार्यवाही बाबत शेतक-यांना लेखी स्वरूपात कळविण्यात यावे. कर्ज पुनर्रगठणाबाबत असलेल्या तक्रारीचे प्रस्ताव सर्व कागदपत्रासह तसेच शेतक-यांच्या संमती पत्रासह  लवकरात लवकर सादर करावे.  जेणेकरून शासनाला  या प्रकरणी  निर्णय घेणे सोपे होईल.
आतापर्यंत  जिल्ह्यात आधार प्रमाणीकरणासाठी  857  गावातील शेतक-यांच्या याद्या प्राप्त झाल्या असुन याद्या प्राप्त झालेल्या शेतक-यांची संख्या 85 हजार  510  तसेच  आधार प्रमाणीकरण झालेल्या  शेतक-यांची संख्या  54 हजार 413 आहे. आणि आतापर्यंत  31 हजार  आधार प्रमाणीकरण शिल्लक आहे.  ज्या शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण करणे  बाकी आहे. अशा शेतक-यांनी तात्काळ आधार क्रमांक , बँक खाते क्रमांक  व कर्ज खात्यातील रक्कम यांची बायोमॅट्रीक्स  पडताळणी  व प्रमाणीकरण  करून घ्यावे असे आवाहन  जिल्हा प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ