प्रयोगशाळा बांधकामाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


अकोला,दि.२१ (जिमाका)- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  उभारण्यात येत असलेल्या कोरोना विषाणू चे निदान करण्यासाठीची प्रयोगशाळा उभारणी बाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनीआज आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या दालनात ही बैठक झाली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवहरी घोरपडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता धिवरे आदी उपस्थित होते.  हे काम युद्धपातळीवर पूर्ण करुन प्रयोग शाळा उभारण्याच्या कामास वेग द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ