करोना विषाणू संसर्ग करोना व्हायरसला घाबरू नका , काळजी घ्या, सावध रहा, लक्षणे दिसल्यास त्वरीत उपचार घ्या -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन
अकोला,दि.5 (जिमाका)- करोना व्हायरसला घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही, काळजी घ्या, सावध रहा व
लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधुन उपचार घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात करोना व्हायरस संबंधीत करण्यात आलेल्या
उपाययोजना बाबत बैठक घेण्यात आली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे
अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूक शेख यांची प्रमुख
उपस्थिती होती.
करोना व्हायरसची लक्षणे दिसल्यावर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला व सर्वोपचार
रूग्णालय येथे स्वतंत्र आयसोलेटेड (विलगीकरण ) कक्ष उघडण्यात आलेला आहे. नागरीकांनी
करोना व्हायरसची लक्ष्ाणे आढळल्यास
उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला व सर्वोपचार रूग्णालय येथे
स्वतंत्र आयसोलेटेड (विलगीकरण) कक्ष येथे संपर्क साधावा, असे
आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले आहे.
नागरीकांनी आपले
हात साबन व पाणी वापरून स्वच्छ धुवावे, शिंकताना व खोकलतांना नाकावर व तोंडावर रूमाला धरावा, सर्दी किंवा
फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या
लोकांशी संपर्क टाळावा, जंगली अथवा पाळीव
प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा, मांस
आणि अंडी पुर्णपणे शिजवून उकडून
खावीत,गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासुन स्वत:चा बचाव करावा आदी उपाययोजना केल्यास करोना
व्हायरस पासून स्वत:चा इतरांचा बचाव होवू शकतो. असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस
यांनी केले.
करोना व्हायरस लागण झाल्यावर सर्दी होते
परंतू नाक वाहत नाही तसेच ताप पण येतो आदि
लक्षणे आढळून आल्यास रूग्णांनी त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे
वागू नये स्वत: उपचार करू नये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय अकोला येथील दुरध्वनी क्रमांक
0724- 2434401 या क्रमांकाशी संपर्क साधून आयसोलेटेड कक्षात जाऊन योग्य उपचार
घ्यावा.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत
प्रत्येक ग्रामीण रुग्णालय , उपजिल्हा
रुग्णालय व जिल्हा रुग्णालय येथे करोना विषाणू
संसर्गापासून स्वत: ला व इतरांना
कसे सुरक्षीत ठेवावे व त्याची लक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. जिल्ह्यामध्ये बस स्टँड, रेल्वेस्टेशन, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय
व स्त्री रूग्णालय येथे ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तालुका
आरोग्य अधिकारी आणि प्राथमिक आरोग्य
केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व पारिचारीकांना जिल्हा पातळीवर प्रशिक्षण देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली.
आज सकाळी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली करोना व्हायरस आढावाच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर , मनपाचे अधिकारी , आरोग्य विभागाचे अधिकारी यांची उपस्थिती
होती.
00000


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा