बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची होणार तपासणी-जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि.२०(जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची वैद्यकीय तपासणी  करण्यासाठी  पथके गठीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
                        जिल्ह्यात सद्यस्थितीत विदेशातून ४६ प्रवासी आलेले असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात मुंबई, पुणे, नागपुर तसेच राज्याच्या विविध भागातून तसेच राज्या बाहेरुनही प्रवासी येत आहेत. अशा प्रकारे जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक प्रवाशांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी रेल्वेस्टेशन अकोला, राज्य परिवहन बसस्थानक अकोला,  खाजगी लक्झरी बसस्थानक, निमवाडी अकोला येथे वैद्यकीय पथक नेमावे असे आदेश  मनपा आयुयक्त अकोला,  जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय अकोला,  जिल्हा आरोग्य अधिकारी  जिल्हा परिषद अकोला यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ