फेब्रुवारीचे निवृत्ती वेतन दि.५ मार्च पर्यंत
अकोला,दि.३ (जिमाका)- राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांना दिले
जाणारे माहे फेब्रुवारी २०२० चे निवृत्ती दि.५ मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे
असे कोषागार अधिकारी मा.ब. झुंजारे यांनी कळविले आहे. माहे फेब्रूवारी २०२० च्या
मासिक निवृत्ती वेतन देयकातून नियमानुसार आयकराची कपात करणे आवश्यक आहे याबाबतची कार्यवाही सुरू आहे. तसेच काही तांत्रिक कारणास्तव माहे फेब्रूवारी
२०२० चे मासिक निवृत्ती वेतन विलंबाने दि. ५ मार्च पर्यंत होणे अपेक्षित आहे, याची नोंद सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतन धारकांनी घ्यावी,असे
आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा