लग्न, समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास प्रतिबंध


अकोला,दि.२०(जिमाका)- अनेक लोक एकत्र आल्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक होत असल्याचे लक्षात घेऊन  लग्न, वास्तूशांती, वाढदिवस इ. समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मनाई करणारे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले आहेत. 
                       अशा समारंभात एकापेक्षा अधिक लोक एकत्र येतात त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे साथरोग अधिनियम १८९७ मधील खंड २,३ व ४ मधील तरतूदीनुसार  तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  नुसार हे आदेश त्यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशान्वये दि. ३१ पर्यंत  लग्न, वाढदिवस, वास्तूशांती इ. समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात  आला आहे.  त्यामुळे या कालावधीतील कार्यक्रम पुढे ढकलावे अथवा  जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करावे. बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांची माहिती  आयोजकांनी प्रशासनाकडे द्यावी. तसेच मंगल कार्यालय व्यवस्थापक, मालकांना द्यावी. त्यांनी ती माहिती  शहरी भागात नगरपालिका , महानगरपालिका  आणि ग्रामिण भागात  गटविकास अधिकाऱ्यांकडे  देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
                       या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी  मनपास्तरावर उपायुक्त स्तरावर व उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली तहसिलदार यांच्या यंत्रणेने आवश्यक कार्यवाही करावी. ग्रामिण भागात गटविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आवश्यक कार्यवाही करावी,असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय गावपातळीवर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली  समिती गठीत करुन  तलाठी, पोलीस पाटील,  अंगणवाडी शिक्षीका,  आशा सेविका यांचा समावेश असून ग्रामसेवक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या सर्व यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समारंभांबाबत माहिती घेऊन  सादर करावी या आदेशाचे पालन न झाल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, (१८६० चा ४५ ) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ