ई- हक्क प्रणालीचा प्रचार-प्रसार करा- जिल्हाधिकारी पापळकर


अकोला,दि.१९(जिमाका)-  ई- हक्क प्रणालीत जिल्ह्यात डिजीटल साईन डाटाबेसचे काम  करण्यात येत असून जिल्ह्यात ३६०१५९ सर्व्हे क्रमांक असून त्यापैकी ३५८८७९ सातबारा डाटाबेस  तयार झाले आहेत. एकूण  ९९.६४ टक्के डाटाबेस करण्यात आला आहे.  तरी नागरिकांनी आता  ई हक्क प्रणालीचा अधिकाधिक प्रचार- प्रसार व  वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  केले आहे.
दैनंदिन कार्यपद्धतीत सुलभता व पारदर्शकता आणण्याच्या
उद्देशाने प्रशासनाकडुन विविध संगणकीय प्रणालीचा अवलंब करण्यात येत
आहे. त्याच अनुषंगाने प्रशासन मागील कित्येक दिवसापासून सर्व /१२ हे
जनतेला ऑनलाईन संगणकीकृत मिळण्याबाबत डिजीटल साईन डाटाबेसचे
(DSD)
काम करीत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण चालू सर्वे क्रमांक
३६०१५९ एवढे आहे त्या पैकी डिजीटल साईन डाटाबेस झालेल्या ७/१२ ची
संख्या ३५८८७९ एवढी आहे. डिजीटल साईन डाटाबेसच्या कामाची
टक्केवारी ९९.६४ % आहे. ई फेरफार प्रणाली अंतर्गत मंडळ अधिकारी यांनी
फेरफार निर्गत करतांना दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पासून फिफो (FIFO) लागू
करणेत आला आहे. कोणताही फेरफार प्रमाणित करतांना तो ज्या अनुक्रमे
फेरफार होण्यास पात्र झाला आहे तो फेरफार अनुक्रमे FIRST IN FIRST OUT
(FIFO)
या तत्वानेच निर्गत करता येतात. यामुळे सरकारी कामामध्ये
पारदर्शकता येणार आहे व खातेदारचे फेरफाराचे काम योग्य रीत्या पार
पडेल.
तसेच इंडिया भूमि अभिलेखांचे आधुनिकीकरण (DILRMP)
अतंर्गत सध्या राज्यभर कार्यान्वित असलेल्या ई फेरफार प्रकल्पाला पूरक
एक नवीन प्रणाली जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या ई हक्क आज्ञावली"
नावाने (PDE-Public data entry) विकसित केली आहे. या प्रणालीव्दारे
कोणत्याही खातेदाराला, संबधित व्यक्तिला तलाठी कार्यालयाकडे
वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफारच्या स्वरुपात घेण्यासाठी जे
अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न
जाता कोठूनही ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात-
                           वारसनोंद, . बोजा/गहाणखत दाखल करणे, . बोजा
कमी करणे, . -करार नोंदी, . मयताचे नांव कमी करणे, .
अज्ञानपालनकर्ताचे नाव (अपाक) कमी करणे, . एकत्र कुटुंब पुढारी
कमी करणे, . विश्वास्तांचे नाव बदलणे या आठ
फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला अर्ज
दाखल करताच त्याची पोहोच ऑनलाईन मिळेल व आपल्या अर्जाची
द्यस्थिती -हक्क प्रणालीतील dashboard वर
(
https://pdeigr.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर व फेरफाराची
सदयास्थिती आपली चावडीवर (https://mahabhumi.gov.in/aaplichavdi) या
संकेतस्थळावर पाहता येईल. कोणत्याही खातेदाराला फेरफार घेण्यासाठी
करावयाचा अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज
नसल्याने त्यांचा वेळ, श्रम व पैसा यांची मोठी बचत होईल. तसेच तलाठी
कार्यालयात प्राप्त अर्जाचा MIS सर्व वरिष्ठ अधिका-यांना उपलब्ध होणार
असलेने या कामाचा मासिक आढावा घेणे सोपे होईल. अशी "ई हक्क"
प्रणाली मा.जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचा
वापर खातेदार यांचे सह बँका, सहकारी सोसायटया, पतसंस्था यांना देखील
वापरता येईल.-हक्क" प्रणाली अशा अनेक प्रकारे सामान्य जनतेच्या
हिताची असलेने "-हक्क" प्रणालीची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या
प्रणालीचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करावा असे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ