प्रशासनाचा मानवी चेहरा;अंत्यविधीची समस्या तात्काळ सोडवली


अकोला,दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी संचार बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जे घडायचे असते ते घडतच असते त्यात दुर्दैवी घटनाही घडत असतात. मात्र अशा दुर्दैवी प्रसंगातही प्रशासनाचा मानवी चेहरा दिलासादायक ठरतो.
आज सकाळी रामनगर परिसरातील  जोशी परिवाराचे हिरालाल बद्रीलाल जोशी यांचे निधन झाले. त्याचे कुटूंबिय धार्मिक रुढीनुसार अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरोहित पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यांना संचार बंदी मुळे  येता येत नव्हते. त्याच वेळी तिकडून पाहणी करत निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व तहसिलदार विजय लोखंडे हे जात होते. त्यांनी तेथे विवंचनेतील हे कुटूंब पाहिले. अंत्यसंस्कारासाठी जमलेली मंडळीही होती. गाडी थांबवून विचारणा केल्यावर कारण समजताच निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांनी स्वतःचे वाहन देऊ केले व त्या वाहनातून गुरुजींना तेथे सोडण्यात आले. त्यानंतर अंत्यविधीचा मार्ग मोकळा झाला. या दुःखाच्या प्रसंगातही जोशी कुटूंबियांना  प्रशासनाचा मानवी चेहरा दिलासा देऊन गेला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ