विशेष सहाय्य योजना:आधार नोंदणीसाठी तहसिल कार्यालयात १७ व १८ रोजी शिबीर

अकोला,दि.१३ (जिमाका)-  समाजातील गोर-गरीब, निराधार, वयोवृद्ध , व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. सध्या या योजनेअंतर्गत  अनुदानाचा  लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी येत्या आर्थ‍िक वर्षात अनुदान   सुरळीत ठेवण्यासाठी हयातीचे   प्रमाणपत्र देणे बंधनकारक  आहे. तसेच सोबत सन २०१९-२० या आर्थ‍िक  वर्षातील उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड संबंधीत तहसिलदार कचेरीत मंगळवार दि. ३१  पर्यंत सादर करणे बंधनकारक  आहे. या संदर्भात आधार कार्ड नोंदणीसाठी जिल्हाभर तहसिल कार्यालय निहाय आधार नोंदणी शिबिर घेण्यात येणार असून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी या शिबिरात उपस्थित राहून आपली आधार नोंदणी करुन घ्यावी.
शिबिराचे वेळापत्रक या प्रमाणे-
मंगळवार दि. १७ रोजी  तहसिल कार्यालय अकोला तसेच  मंगळवार दि. १७ व बुधवार दि. १८ रोजी तहसिल कार्यालय अकोट , बाळापूर, बार्शी टाकळी,  मुर्तिजापूर,  पातूर, तेल्हारा येथे ही नोंदणी संजय गांधी निराधार योजना  व तहसिल कार्यालयात होणार आहे. त्यासाठी संबंधित तहसिलदार व आधार नोंदणी कर्त्यांचे नाव व संपर्क क्रमांक याप्रमाणे-
अकोला- श्रीकांत घुगे (९७६४९२४८२४), नितेश शिरसाठ (९६०४९५७२६५)
अकोट- हरीश गुरव( ७९७२६७१२२७), रवि ठाकूर (७२१८३७६५५५)
बाळापूर- योगेश कोतकर(९९७५८६८४२८), आधार गवई (९८८१२६४६६७)
बार्शी टाकळी- विनोद पाचपोहे (९४२१७८७४८१), सुधीर दिधोलकर (७७०९४७९९०८)
मुर्तिजापूर- ए.ए. खान (८४२१६९७३१३), संतोष गुप्ता (८४८३९४०७८६)
पातूर- राजेश बोंडे (९८२२३९८२०७), अजय देशमुख (९८५०३४४६३१)
तेल्हारा- विजय सुरडकर(८६६९३४९३३६), निखिल गालखे (९९२३१०७९२३)
नमूद दिवशी लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयात उपस्थित राहून आपली आधार नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन करण्यात  आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ