आर्थिक वर्ष समाप्तिः ३१ रोजी स्टेट बॅंक व कोषागरे रात्री १० पर्यंत सुरु


अकोला,दि.२८ (जिमाका)-  वित्तीय वर्ष सन २०१९-२०  हे येत्या मंगळवार दि.३१ रोजी संपत आहे.  शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याच्या दृष्टीने  दि. ३१ रोजी जिल्हा कोषागार, उपकोषागार व तत्संबंधित व्यवहार करणाऱ्या बॅंकांमधील देयक, धनादेश यांचे प्रमाण हे नेहमीपेक्षा अधिक राहिल. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी   जिल्ह्यातील अकोला जिल्हास्तरीय भारतीय स्टेट बॅंक, ट्रेझरी शाखा,  तालुकास्तरावरील पातूर, अकोट, तेल्हारा, मुर्तिजापूर, बाळापुर, बार्शीटाकळी येथील स्टेट बॅंकेच्या शाखा  व जिल्हा कोषागार कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालये  रात्री १० वाजेपर्यंत शासकीय व्यवहारांसाठी सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ चे नियम ४०९ नुसार त्यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ