जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रमाणपत्र: उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क कक्ष कार्यान्वित


अकोला,दि.२६ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर  अत्यावश्यक सेवाचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करता यावा यासाठी जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश अपर परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या कार्यालयातून निर्गमित झाले आहेत.
यासंदर्भात विविध वाहतुक संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीवरुन  त्यांना जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक विना अडथळा करता यावी यासाठी  प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन  कार्यालयातून देण्यात येणार आहे.  त्यादृष्टीने अकोला येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र संपर्क कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात मोटारवाहन निरीक्षक खेडकर (९८६०५९५८१०) व मोटारवाहन निरीक्षक कदम (९१५८०५०४००) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कक्षाशी पत्रव्यवहार करण्यासाठी ई-मेल आय डी mh30@mahatranscom.in असा आहे. हा संपर्क कक्ष सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे,असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ