सावकारी कर्ज प्रकरणात शेतक-यांना न्याय देण्यासाठी विशेष सहकार्य करणार -पालकमंत्री ना.बच्चू कडू


    
        अकोला,दि. 9 (जिमाका)-   शेतक-यांची एकुण सावकारी कर्ज प्रकरणे 40 असुन त्यापैकी काही प्रकरणे  उपनिबंधक , काही प्रकरणे  विभागीय  सहनिबंधक , काही प्रकरणे  सहकार आयुक्त पुणे तर काही प्रकरणे  हायकोर्टात  प्रलंबीत आहेत. शेतक-यांनी आपले प्रकरणे  कोणत्या  सावकाराकडे किती व कोणत्या  विभागाकडे    किती यांची माहिती  एकत्रीतरित्या दिली तर सावकारी कर्ज प्रकरणाचे  शेतक-यांना न्याय देण्यासाठी  विशेष सहकार्य  करण्यात येईल अशी ग्वाही  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास,शालेय शिक्षण व कामगार कल्याण राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश  उर्फ बच्चू कडु यांनी दिली. नियोजन भवनात आयोजीत  सावकारी कर्ज प्रकरणाचा  निरासणासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर  , सहकारी संस्थाचे  उपनिबंधक  डॉ. प्रविण लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती.
            आवश्यक असल्यास शेतक-यांना  हायकोर्टमध्ये केस लढविण्यासाठी   वकील सुद्धा  देण्यात येईल तसेच आवश्यक वाटल्यास   शेतक-यांच्या  बाजुने न्याय देण्यासाठी  सहकार विभाग  कडून  परिपत्रक काढण्यासाठी  प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन ना. कडू यांनी दिले.
            यावेळी  सोनं तारण प्रकरणे,  पिक कर्ज प्रकरणे, पिक विमा प्रकरणे व  शेतक-यांच्या  इतर तक्रारीचे  निवेदने स्विकारण्यात आलीत.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ