कोरोना मुकाबल्यासाठी जिल्हाप्रशासनाचा‘टास्क फोर्स’


अकोला,दि.२९ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर देशात लागू असलेला लॉक डाऊनमुळे शासनाने निर्धारित केलेल्या नागरिकांना द्यावयाच्या अत्यावश्यक सेवा सुविधांवर नियंत्रण ठेवून त्यांचे नियमन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाप्रशासनाचा ‘टास्क फोर्स’ गठीत केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या समितीत एकूण ११ अधिकाऱ्यांचा समावेश असून  त्यांनी ती जबाबदारी पार पाडावी असे निर्देश दिले आहेत.
या समितीत अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे आरोग्य विभागाशी संबंधित आराखडा तयार करणे जिल्हा आरोग्य यंत्रणा समन्वय, रक्ताची उपलब्धता,औषध पुरवठा सुरळीत राखून साठेबाजी रोखणे,खाजगी डॉक्टर्सचे दवाखाने सुरु ठेवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कलम १४४च्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हा पोलीस दलाशी समन्वय,  वाहने अधिग्रहण, मंत्रालयाशी समन्वय, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचलन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले व जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे यांनी जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, पेट्रोल डिजेल वितरण, गॅस सिलिंडर उपलब्धता, शिवभोजन योजना अंमलबजावणी इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे यांच्याकडे सेवाभावी संस्थांचे व्यवस्थापन, घरकामगार, ऑटोरिक्षाचालक , खाजगी वाहन चालक आदींबाबतचे प्रश्न व व्यवस्था, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार यांच्याकडे वाहतुक व्यवस्था, कामगारांसंदर्भातील प्रश्न, उपजिल्हाधिकारी महसूल यांच्याकडे कृषि विषयक बाबी, पाणी पुरवठा व विज पुरवठा, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दौड विविध विभागांशी समन्वय राखून माहिती संकलन करणे, जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी माध्यमांशी समन्वय राखून जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती माध्यमांना देणे, प्रसिद्धीबाबत उपाययोजना करणे, जिल्हा प्रशासन अधिकारी श्रीमती टवलारे यांनी नगरपालिका क्षेत्रातील उपाययोजनांचे नियमन करणे, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी नितीन चौधरी जिल्हा संपर्क यंत्रणा सुरळीत ठेवणे याप्रमाणे जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ