‘त्या’१२ देशांतून आलेल्या प्रवाशांचे अलगीकरण, विलगीकरण अनिवार्य

अकोला,दि.१९(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  १२ देशांतून आलेल्या प्रवाशांचे अलगीकरण (Quarantine) व विलगीकरण (Isolation) अनिवार्य करण्यात आल्याच्या मार्गदर्शक सुचना  जिल्हा प्रशासनाला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्राप्त झाल्या आहेत.
याआधी  चीन, इटली,  इराण, दक्षिण कोरिया,  फ्रान्स, स्पेन, जर्मनी या कोरोनाबाधीत सात देशांमधून वा त्या देशांमार्गे आलेल्या  प्रवाशांची विमानतळावर तपासणी करुन त्यांचे अलगीकरण व विलगीकरण अनिवार्य करण्यात आले होते. बुधवार (दि.१८) पासून त्यात   संयुक्त अरब एमिरेट्स (यु.ए.ई), कतार, ओमान, कुवेत, यु.एस.ए (अमेरिका) या पाच देशांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता आता १२ देशांतून वा त्या मार्गे आलेल्या प्रवाशांचे अलगीकरण, विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
प्रवाशांची तपासणी केल्यानंतर त्यांची जोखमीनुसार करावयाची विभागणी-
१)     अ- प्रवर्ग (अतिजोखीम)- या प्रवाशांमध्ये  ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणे दिसून येतात. त्यांनी कोव्हीड १९ प्रादुर्भाव असलेल्या देशांतून प्रवास केला आहे किंवा गेल्या १४ दिवसांत त्या  देशांतून आलेले लोक त्यांच्या थेट संपर्कात आले आहेत.
उपचार कार्यवाही- अशा प्रवाशांचे विलगीकरण करुन  रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य.
२)     ब- प्रवर्ग (मध्यम जोखीम)- अ- प्रवर्गाची लक्षणे न दिसणारी परंतू ६० पेक्षा अधिक वय असणारी तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, कर्करोगग्रस्त, कोणत्याही प्रकारचे प्रत्यारोपण झालेले, इम्युनो सप्रेसिव्ह थेरपी सुरु असलेले प्रवासी या प्रवर्गात येतात.
उपचार कार्यवाही- अशा प्रवाशांची विमानतळावर कार्यरत वैद्यकीय चमूने  तात्काळ तपासणी करुन अलगीकरण कक्षात  १४ दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवावे. या कालावधीत  त्यांना सर्दी, ताप, खोकला  किंवा श्वसनाचा त्रास  यापैकी काहीही लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे.
३)     क- प्रवर्ग (कमी जोखीम)-  वर नमूद देशातून आलेले प्रवासी तथापि, अ, व ब प्रवर्गात नमूद लक्षणे नसणारे  प्रवासी.
उपचार कार्यवाही-  अशा प्रवाशाचे अंतिम गंत्यव्यस्थान राज्यात किंवा राज्याबाहेर कोठेही असल्यास अशा प्रवाशांना ते ज्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर  उतरले असतील त्या विमानतळाजवळ असलेल्या अलगीकरण कक्षात  अलगीकरण करावे.
घरगुती अलगीकरण ( Home Quarantine) बाबत सुचना-  जेथे अलगीकरण करण्यात येणार आहे त्या घराचा पत्ता, संपर्क क्रमांक, हमीपत्र नोंदवून घ्यावे, भ्रमणध्वनीची जागीच खातरजमा करावी,  अशा प्रवाशांना निवडणूकीची  शाई वापरुन  तळहाताच्या पाठीमागे  दिसेल अशा ठिकाणी स्टॅम्प मारावा. अनिवार्य अलगीकरण स्टॅम्प केलेली व्यक्ती निर्धारीत घराबाहेर आढळल्यास कलम १८८ नुसार कारवाई करावी. अशा व्यक्तीची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनलाही द्यावी.
अशा सुचना शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ