दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तूर्त बंद


अकोला,दि.२०(जिमाका)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  व दिव्यांगांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून  दिव्यांगांना वैद्यकीय मंडळ प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तूर्त बंद करण्यात येत असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली आहे. प्रादुर्भाव कमी होईपर्यंत व पुढील आदेश होईपर्यंत ही कार्यवाही बंद राहील असेही कळविण्यात आले आहे. यासंदर्भात पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ