कुक्कूट पक्ष्यांचे आहारातूनर कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही अफवांना बळी पडू नका


अकोला,दि. 9 (जिमाका)- कोरोना विषाणूचा संक्रमणाबाबत समाजमाध्यमातून प्रसार होत असलेल्या चुकीच्या समाजामुळे कुक्कुट  व्यावसायिकांना फार मोठ्या नुकसानाला सामोरे जावे  लागत आहे.
तांत्रिक दृष्ट्या कोराना विषाणूचा संक्रमण हे माणसातून माणसाला होणारा  आजार असून त्यांचे संक्रमण  पक्षात होत नाही अथवा पक्षातून माणसाला होत नसल्याने शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहे.
केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन एव  डेअरी   मंत्रालय, पशुपालन  और डेअरी विभाग , कृषी भवन , नई दिल्ली- 110001 यांचे दि. 10 फेब्रूवारी 2020 च्या अधिसुचना नुसार 2019  - Noval Corona Virus (2019-nCOV)  यांचे संक्रमण माणसातून माणसाला (Human to Human) होणारा आजार आहे. (OIE-Office International Epizootics) च्या मार्गदर्शक  सुचनानुसार)  तसेच सन 2002-03 मध्ये (SARS-Severe Respiratory Syndrome) व सन 201-13  मध्ये (MERS-middle East Respiratory Syndrome) व सन 2012-13  मध्ये  (MERS-Middle East Respiratory Syndrome) झालेल्या करोना विषाणमुळे  सुद्धा  श्वसन रोग उद्भवल्याचे  आढळले असुन त्यांचे  संक्रमण  जागतिक दृष्ट्या पक्षात आढळून आले नाहीत (OIE-Office International Epizootics च्या मार्गदर्शक सुचनानुसार) त्यामुळे कुक्कुट पक्ष्यांचे आहार  करणे  हे अपायकारक नसल्याचे अधिसुचित केले आहे.
चिकन मधून कोरोना विषाणुचा संक्रमण  असल्याबाबत समाजमाध्यमातून  पसरविण्यात येत असलेल्या   चुकीच्या  माहितीमुळे कुक्कुट व्यावसायिकांना नुकसान   होत असुन या   अफवांवर/ गैरसमजावर नागरिकांनी दुर्लक्ष्य करावे असे आवाहन   पशुसंवर्धन विभाग अकोला यांचे मार्फत करण्यात येत आहे. तसेच वैयक्तीक स्वच्छता  बाळगल्यास या  रोगाचा प्रसार  टाहू शकता येते  बाबत आरोग्य विभागाकडून निर्देशित करण्यात येत आहे. असे जिल्हा  पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी कळविले आहे.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ