पोस्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबीत अर्ज निकाली काढावेत


अकोला,दि.5 (जिमाका)-  माहिती  व तंत्रज्ञान विभागाने विकसीत केलेल्या महाडिबीटी पोर्टलवरून सामाजिक न्याय विभाग व विजाभज,  विमाप्र कल्याण  विभागाच्या पोष्ट मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती  योजन सन 2018-19 पासुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत. सन 2019-20 मधील महाडिबीटी पोर्टल वरील अर्जाचा याप्रमाणे.
सामाजिक न्याय विभाग – एकुण नोंदणीकृत अर्ज 16056 , महाविद्यालयाने मंजुर केलेले अर्ज- 12743, संस्थास्तरावर प्रलंबीत अर्ज- 1412 , विभागाने मंजुर केलेले अर्ज- 12247, त्रुटी अभावी अर्जदाराकडे परत  पाठविण्यात आलेले अर्ज- 603,  विजाभज, ईमाव व  विमाप्र कल्याण - एकुण नोंदणीकृत अर्ज 26300 , महाविद्यालयाने मंजुर केलेले अर्ज- 21410, संस्थास्तरावर प्रलंबीत अर्ज- 2118 , विभागाने मंजुर केलेले अर्ज- 20461, त्रुटी अभावी अर्जदाराकडे परत  पाठविण्यात आलेले अर्ज- 804 असा आहे.
महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी शासनाने 8 मार्च 2020 ही अंतिम तारीख ठरवुन दिलेली आहे. त्यामुळे  ज्या महाविद्यालयाकडे अर्ज प्रलंबीत होते अशा महविद्यालयांची दिनांक  25 फेब्रूवारी  व दिनांक 4  मार्च रोजी जिल्हाधिकारी तथा उच्चस्तरीय शिष्यवृत्ती  समस्‍या   निराकरण  समिती अकोला यांचे  अध्यक्षतेखाली सभा आयोजीत  करण्यात आली होती.  या सभेमध्ये प्रलंबीत  अर्जाचा आढावा घेऊन सर्व अर्ज विहीत मुदतीत निकाली काढण्याचे  निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत. जे महाविद्यालय  सभेत अनुपस्थित होते. तसेच ज्यांनी शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबीत ठेवलेले आहेत.  त्या  महाविद्यालयांना कारणे दाखवा  नोटीस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी  दिलेत. मागासवर्गीय  विद्यार्थी  शिष्यवृत्तीपासुन वंचीत राहिल्यास त्यासाठी  महाविद्यालय जबाबदार राहील. तसेच संबधीत महाविद्यालय/संस्था  यांचे निधीतुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम अदा करावी लागेल असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
ज्या महाविद्यालयांकडे अद्यापही सन 2019-20 मधील शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबीत आहेत,  त्यांनी विहीत कालावधीत सर्व अर्ज निकाली काढावेत असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेत, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, अकोला यांनी कळविले आहे.            00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ