डाक विभागातर्फे शनिवार (दि.१४) पर्यंत ‘आधार सप्ताह’


        अकोला,दि.११ (जिमाका)-   महाराष्ट्र व गोवा राज्यात  सर्व डाक घरात  आधार सप्ताहाचे  आयोजन रविवारपासून (दि.८) करण्यात आले आहे. येत्या शनिवार दि. १४ पर्यंत हा सप्ताह राबविण्यात येणार आहे.  महाराष्ट्रातील १२९३ आधार केंद्राचा  यात  समावेश आहे. आधार सप्ताह दरम्यान विशेष आधार शिबीर डाकघरामध्ये आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ सर्व नागरीकांना घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.   या  विशेष  आधार शिबीरांमध्ये पाच वर्ष ते १५ वर्ष वयोगटातील बालकांना ही सेवा विनामुल्य आहे.  तसेच आधार अपग्रेडेशन सेवाही उपलब्ध  आहे, अशी माहिती प्रवर अधिक्षक, मुख्य डाकघर, अकोला यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ