२७ पैकी २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह


अकोला,दि.२७ (जिमाका)- आजअखेर अकोला जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्या ही शून्य आहे. तथापि आजपर्यंत २७ जणांचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अन्य  सहा अहवाल प्रलंबित आहेत.
 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२३ प्रवाशी ही विदेशातून आलेले आहेत. त्यातील सध्या ४८ जण हे गृह अलगीकरणात आहेत. तर ६८ जणांचा गृह अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सहा प्रवासी हे विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत. अद्याप जिल्ह्यात एकही संसर्गित रुग्ण आढळलेला नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना