शून्य रुग्णः अकोला जिल्ह्याची जमेची बाजू; पाच जणांपैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह, दोन अहवाल प्रलंबित


अकोला,दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे आज अखेर पर्यंत बाधीत रुग्ण संख्या ही शून्य आहे. शून्य रुग्ण हीच जिल्ह्याच्या दृष्टिने जमेची बाब ठरली आहे. दरम्यान आज पाच व्यक्तिंना दाखल करण्यात आले. त्यांची तपासणी करुन त्यांचे नमुने पाठवण्यात आले आहे. त्यातील तिघांचे नमुने  निगेटिव्ह आले आहेत. अन्य दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे यातील दोघांनाही परदेश प्रवास केल्याची पार्श्वभुमि नाही. दरम्यान आतापर्यंत विदेशातून ९६जण जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यातील ९५ जणांशी संपर्क झालेला आहे. ४८ जण गृह विलगीकरणात आहेत. तर दोघे जण अलगीकरणात आहेत. आतापर्यंत ४५ जणांचे गृह विलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली असून ते पुर्णतः निरोगी आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ