पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना धनगर समाजातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवार पर्यंत (दि.२०)अर्ज मागविले


अकोला,दि.१६ (जिमाका)-  आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या  योजनांच्या  धर्तींवर भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना  पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना  सुरू करण्यात आली आहे.  ही योजना महानगरपालिका,‍विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या  धनगर समाजातील  विद्यार्थ्यांना सन २०१९-२०  या शैक्षणिक वर्षापासुन लागू आहे. या योजनेद्वारे इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात  प्रवेश न मिळालेल्या  धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना  भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून  घेण्यासाठी  विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याची तरतुद आहे. या योजनाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. २० पर्यंत अर्ज  सादर  करावेत.
पात्रतेचे निकष-  विद्यार्थी हा भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर  समाजातील असावा, अर्जासोबत  जातवैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक, विद्यार्थ्याच्या  पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्यांने  ज्या शहरातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला आहे तो त्या शहरातील रहिवासी नसावा, विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा    इयत्ता १२ वी मध्ये किमान ६० टक्के गुण प्राप्त असावे, केंद्र शासनाच्या पोस्टमॅट्रिक शिष्यवृत्ती करिता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना  या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल,  तथापि दोन  वर्षापेक्षा कमी कालावधीच्या  अभ्यासक्रमासाठी  योजनेचा  लाभ मिळणार नाही, अखिल भारतीय  तंत्र  शिक्षण परिषद, अखिल भारतीय  वैद्यकीय परिषद, भारतीय  फार्मसी परिषद,  वास्तुकला परिषद,  राज्य शासन किंवा  तत्सम  संस्था इत्यादी मार्फत मान्यता प्राप्त  महाविद्यालयात/ संस्थेमध्ये  व मान्यता प्राप्त  अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस प्रवेश मिळालेला असावा,  योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित  विद्यार्थ्यांचे कमाल वय वर्ष २८ पेक्षा जास्त नसावे, विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार  करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि.२० पर्यंत  अर्ज करावा.अर्जदाराने त्याचे बँक खाते आधारसंलग्न करणे आवश्यक आहे, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला  यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ