नरनाळा विकास आराखडा नरनाळा किल्ल्याचा चेहरामोहरा बदलणार -पालकमंत्री ना. बच्चू कडू


                                          




                                       
        अकोला,दि. 9 (जिमाका)-  नरनाळा विकास  आराखडा अंतर्गत नरनाळा किल्ला व परिसराचा विकास  करण्यासाठी 95 कोटी  30 लक्ष रूपयांचे नियोजन  करण्यात आले  असुन नरनाळा किल्ल्याचा चेहरामोहरा बदलणार असल्‍याचे प्रतिपादन पालकमंत्री  ना. बच्चू कडू  यांनी केले.
            नरनाळा विकास  आराखडाच्या  संदर्भात  पुरातत्व , पर्यटन वनविभाग  व सार्वजनिक  बांधकाम  व जिल्हा प्रशासन  विभागाची आढावा  बैठक जिल्हाधिकारी  यांच्या दालनात  घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र  पापळकर  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार  पुरातत्व  विभागाचे  मिलींद  अंगाईतकर , पर्यटन विभागाचे  हनुमंत हेडे,  वनविभागाचे  श्री. चौहान , सार्वजनिक  बांधकाम  विभागाचे कार्यकारी अभियंता प्रविण सरनाईक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय  खडसे, वुई थ्री   डिझाईन स्टुडिओचे आयुष गुप्ता यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री ना. कडू  पुढे महणाले की, नरनाळा किल्ल्याची ओळख  कायम ठेवून त्याचा  ऐतिहासिक वारसा जपून  पर्यटकांना  आकर्षित करण्यासाठी सुंदर देखणा  व शोभिवंत परिसर निर्माण करावा. असे सांगुन पालकमंत्री म्हणाले की,  उन्हाळ्यात सुद्धा  नरनाळ्याचा परिसर  हिरवागार राहील यासाठी उपाययोजना कराव्यात जुनं ते सोनं  हे समजुन नरनाळा  किल्ल्याचा विकास  करावा
             मेंढा गेट ते महाकाली  गेट व  महाकाली गेट ते राणीमहल पर्यंत पर्यंटकासाठी खास अशी पाऊल वाट निमार्ण करावी असे सांगुन  ना. कडू पुढे म्हणाले की, नरनाळा किल्ल्यासोबत पायथ्याशी असलेल्या  शहानुर गावाचाही   विकास करावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील  स्थानिक आदिवासी समाजाचे  मुळपण  जपुन  तेथील  घर , रस्ते यांचा विकास करावा. स्थानिक आदिवासी बांधवाना  रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांचे खाद्य , वस्त्र, सण  व त्यौहार  तसेच त्यांची संस्कृती जपणारे आदिवासी गाव  निर्माण करावे , कोणत्याही प्रकारचे बाजारीकरणे  होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिलेत. स्कायवॉक, रोपवे तसेच पर्यटन विभागाने  पर्यटकांसाठी रिसॉर्ट निर्माण करावे असे त्यांनी सांगितले.
             नरनाळा विकास आराखडासाठी 95.30 कोटी निधी राखुन  ठेवण्यात आला असुन यामध्ये  पुरातत्व विभागासाठी  23 कोटी,  पर्यटन  विभागसाठी  18  कोटी,   वनविभागासाठी  62 लक्ष    बांधकाम विकासासाठी  39 कोटीची तरतुद करण्यात आली आहे.  तसेच अकोला शहरातील असदगड किल्ल्यासाठी 13.55 कोटी रूपये  ठेवण्यात  आले असण्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ