कामगार- कर्मचाऱ्यांची सेवा व वेतन अबाधित राखा


अकोला,दि.२१ (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाच्या वतीने लोकांना घरी राहण्याचे सांगण्यात येत आहे. तसेच दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.  त्या अनुषंगाने कामगार आयुक्तांनी  या दुकाने व आस्थापनांवरील कामगार कर्मचारी यांची सेवा व वेतन त्यांच्या मालकांनी अबाधित ठेवावी असे आवाहन केले आहे.  कर्मचारी कामावर नसल्याचा कालावधीचे वेतन व भत्ते त्यांना देण्यात यावे तसेच त्यांना कामावरुन कमी करु नये. अकोला जिल्ह्यातील विविध दुकाने, आस्थापनांनीही  आपले कामगार कर्मचारी यांची सेवा, वेतन भत्ते त्यांना पूर्ववत द्यावे, कोणासही कामावरुन कमी करु नये ,असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त  राजेश गुल्हाणे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ