रेल्वे स्टेशन जवळील विश्रामगृहात विलगीकरण केंद्र


अकोला,दि.१३ (जिमाका)-  कोरोना विषाणु प्रसार रोखण्याचा प्रतिबंधात्मक  उपाययोजना  व पूर्वतयारी  म्हणून अकोला शहरातील  रेल्वे  स्टेशन जवळील परिसरात असलेल्या शासकीय  विश्रामगृहात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मान्यता दिली आहे.  तसे आदेश आज निर्गमीत झाले या इमारतीचा परिसर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार  प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
ज्या व्यक्तिंना  १४ दिवस निरीक्षणात  ठेवायचे आहे त्यांना या इमारतीत ठेवले जाईल. त्यासाठी  ही इमारत जिल्हाशल्य चिकित्सकांच्या ताब्यात देण्याचे आदेश   आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५  (६५)(१) अन्वये जारी करण्यात आले आहेत. या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय अधिकारी - कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त कोणही व्यक्तीस इमारतीच्या आवारात  प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच येथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनिय ठेवावी, असेही आदेशात नमुद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ