शुभ वर्तमानः दाखल शून्य, रुग्ण शून्य , अकोलेकरांना घरात थांबण्याचे आवाहन


अकोला,दि.२८ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात आज नव्याने कोणीही संशयित वा प्रवासी म्हणून दाखल झाले नाही. त्यामुळे अकोला जिल्ह्यासाठी शुन्य दाखल व रुग्णही शून्य ही गुड न्युज ठरली आहे. लोकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन असेच सुरु ठेवले तर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव आपण रोखू शकू असा विश्वास आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकही कोरोना संसर्गित व्यक्ती नाही. त्यात दररोज विदेशातून आलेले व संशयिल लक्षणांमुळे दाखल होणारे रुग्ण आज दाखल झाले नाहीत. आज एकही दाखल न झाल्याने आजचे इनकमिंग शून्य होते. आतापर्यंत २७ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. त्यातील सर्व जणांचे अहवाल प्राप्त झाले असून  ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात विदेशातून १२४ लोक आले. त्यातील ४९ जण सध्या गृह अलगीकरणात आहेत. त्यांचेवर वैद्यकीय पथक नियमित लक्ष ठेवून आहेत. तर ७४ जणांचा गृह अलगीकरणाचा कालावधीही पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात एकही व्यक्ती दाखल नाही,असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.
आता लोकांनी उर्वरित कालावधीसाठी आपल्या घरातच राहणे व दिलेल्या निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे हे महत्त्वाचे आहे. लोकांनी घरातच रहावे, विनाकारण बाहेर पडू नये म्हणजे हा शून्य आपण कायम ठेवू शकू असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ