बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार: ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची लॉटरी आज (दि.१७) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे


अकोला,दि.१६ (जिमाका)-  बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९(आरटीई)  नुसार दरवर्षी  २५ टक्के प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने राज्यभरात केले जातात. यावर्षीही (सन २०२०-२१) प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया मंगळवार दि.१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी चार यावेळात होणार असून यावेळी ही प्रक्रिया कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राबविण्यात येणार आहे. लॉटरी लागल्याचे किंवा प्रतिक्षा यादीत असल्याचे एसएमएस पालकांना गुरुवार दि.१९ रोजी  दुपारनंतर प्राप्त होतील. याबाबत पालक स्वतः  आरटीई पोर्टलवर जाऊन Application wise Details वर क्लिक करुन आपला अर्ज क्रमांक टाकून माहिती पाहून खात्री करु शकता. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता पालकांनी पडताळणी समितीकडे गर्दी करु नये असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) प्रकाश मुकूंद यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ