अकोला डाक विभागाची सेवा; पोस्टमन आणून देणार बॅंकेतून रक्कम आणि किराणा


अकोला,दि.३१ (जिमाका)-  अकोला डाक विभागामार्फत  लॉक डाऊन कालावधीत ग्राहकांना विविध सेवा दिल्या जाणार आहेत. या सेवा अकोला व वाशिम जिल्ह्यात देण्यात येणार आहेत.  या कालावधीत जे नागरिक घराबाहेर येऊ शकत नाहीत त्यांना  त्यांच्या राष्ट्रीय बॅंक खात्यातून  दहा हजार रुपयांपर्यंतच रक्कम पोस्टमन मार्फत घरपोच अदा करण्यात येईल. या सोबतच किराणा माल ही पोहोचविण्यात येणार आहे.  त्यासाठी ज्यांचे राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते आहेत त्या व्यक्तींनी प्रवर अधिक्षक डाक घर अकोला विभाग अकोला यांच्या  दूरध्वनी  ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळात आपले नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम  आणि हवे असलेले किराणा सामान याची माहिती द्यावी. पोस्टमन मार्फत घरपोच रोख रक्कम व किराणा सामान पोहोचविले जाईल. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधिक्षक  डाकघर अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे. या सेवेचा लाभ हा ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्या घरी बाहेर जाऊन सामान आणण्यासाठी कोणी व्यक्ती नाही अशांसाठी उपयुक्त ठरेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ