प्रांत; तहसिलदार यांचेवर उपविभागांची व तालुक्यांची जबाबदारी


अकोला,दि.२५ (जिमाका)- आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आता कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी त्या त्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांचेवर व तालुक्याची जबाबदरी तहसिलदारांवर सोपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. त्यांना त्यांच्या क्षेत्रापुरते इन्सिडन्ट कमांडन्ट म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानुसार ते आता त्यांच्या भागातील आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत.
पेट्रोलपंपांसाठी नियमावली
 जिल्ह्यात पेट्रोल पंप हे अत्यावश्यक सेवेचा भाग म्हणून सुरु ठेवण्यात आले आहेत. तथापि पेट्रोलपंप चालकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली असून या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही नियमावली करण्यात आली आहे. त्यानुसार पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी होऊ नये यासाठी व्यवस्था करणे, दोन ग्राहकांत किमान तीन फुटाचे अंतर राखणे, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाययोजना पुरविणे. मास्क, सॅनिटायझर, पाणी साबण यांची व्यवस्था करणे बंधनकारक आहे.
औषध वाहतूकीची अडचण दूर
 जिल्हाअंतर्गत औषधे व वैद्यकीय उपकरणे साहित्यांची वाहतुक करण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. वाहनांना अडविण्यात आले होते. ही अडचण दूर करण्यासाठी  या वाहनांसाठी विशिष्ट स्टिकर्स बनविण्यात आले असून ते त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ही अडचण आता दूर झाल्याचेही जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे ही, ही संचारबंदी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे. त्यामुळे लोकांनी घरीच रहावे. सर्व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आपल्या जवळच असल्याने लोकांनी विचलित होऊ नये. सामान खरेदी वा भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ