ग्रा.पं निवडणूक कार्यक्रमात बदल


         अकोला,दि.13 (जिमाका)-  राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. करण्यात आलेल्या बदलात नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी दिनांक 16  मार्च  2020 रोजी सायंकाळी  5. 00 वा पर्यंत वाढविण्यात आला आहे. सुधारीत निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
 नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ - शुक्रवार दि. 6 ते सोमवार  दि.16 मार्च   वेळ  सकाळी 11 ते सायं. पाच.   (शनिवार दि. 14   रविवार दि.15 मार्च  वगळून)
 नामनिर्देशन  छाननी करण्याचा दिनांक  व वेळ - मंगळवार दि.17 सकाळी 11 ते  छाननी संपेपर्यंत.
नामनिर्देशनपत्र  मागे  घेण्याचा  अंतिम  दिनांक  व वेळ - गुरूवार दि. 19 दुपारी तीन वा. पर्यंत. 
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच  अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची  यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक -  गुरूवार दि. 19  दुपारी तीन वा.
आवश्यक  असल्याचा मतदानाचा दिनांक-  मंगळवार दि. 31 मार्च सकाळी  साडेसात  वा. पासुन ते सायं साडेपाच वा. पर्यंत अखंड (गडचिरोली जिल्ह्यासाठी  सकाळी साडेसात वा. पासुन ते  दु. तीन वा. पर्यंत).
मतमोजणीचा दिनांक-बुधवार दि. एक  एप्रिल (मतमोजणीचे ठिकाण  व वेळ  जिल्हाधिका-यांच्या  मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूकीच्या निकालाची अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार  दि. सात एप्रिल पर्यंत.
         दिनांक  14 मार्च  व दिनांक 15 मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी अर्जदारांना  नामनिर्देशनपत्र केवळ  संगणकप्रणालीमध्ये भरण्याची सोय उपलद्ध असेल,असे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ