पिककर्ज व्यवहारास ३१ मे पर्यंत मुदतवाढ


अकोला,दि.२९ (जिमाका)-  कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  किसान क्रेडीट कार्ड या योजनेद्वारे पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिक कर्जाचे खाते व्यवहार पूर्ण करण्यास ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक तरोनिया यांनी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय कृषि मंत्रालयाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पीककर्ज परतफेड तसेच व्याजाच्या वसूलीसही  ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा