१४ हजार ९१७ जणांचे स्क्रिनिंग;२६ पैकी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह


अकोला,दि.२६ (जिमाका)- आज अखेर पर्यंत अकोला जिल्ह्यात बाधीत रुग्ण संख्या ही शून्य आहे. तथापि आजपर्यंत विदेशातून तसेच मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातून आलेल्या  एकूण १४ हजार ९१७ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तर आतापर्यंत २६ जणांचे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अन्य सात अहवाल प्रलंबित आहेत.
 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११८ प्रवाशी ही विदेशातून आलेले आहेत. तर मुंबई, पुणे यासारख्या  शहरातून १४ हजार ७९९ प्रवासी आले आहेत.  त्या सर्वांचे स्क्रीनिंग आरोग्य यंत्रणेने केले आहे.  विदेशातून आलेल्या ११८ प्रवाशांची स्क्रिनिंग नंतर  तपासणी करण्यात आली. त्यातील सध्या ५३ जण हे गृह अलगीकरणात आहेत. तर ५९ जणांचा गृह अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला आहे. सहा प्रवासी हे विलगीकरण कक्षात निरीक्षाणात आहेत. अद्याप जिल्ह्यात एकही संसर्गित रुग्ण आढळलेला नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात २६ जणांचे घशातील स्त्राव  तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आजअखेर त्यापैकी १९ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर सात जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आज दाखल झालेल्या चौघांचा समावेश आहे. जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ