कोरोनाः तुरुंग प्रशासनाचा वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेवर भर बंदीजन करतायेत ‘मास्क’ निर्मिती


अकोला,दि.20
(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी सर्वत्र विविध उपाययोजना होत असतांना तुरुंगांमध्ये बंदिवासात असणाऱ्या बंदीजनांचे ही या विषाणू संसर्गापासून रक्षण व्हावे यासाठी तुरुंग प्रशासन विविध उपाययोजना करुन काळजी वाहतांना दिसत आहे. कैदी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तसेच एकूणच तुरुंग आवारातील  सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. या शिवाय येथील कैद्यांकडून कापडी मास्क शिवून घेण्याचे कामही कारागृहात सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही हे मास्क देण्यात येतील असे यावेळी सांगण्यात आले.
यासंदर्भात अकोला मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक  ए.एस.सदाफुले यांनी दिलेल्या माहिती नुसार, जिल्हा अकोला मध्यवर्ती कारागृहात ४५३ कैदी आहेत. त्यात ३९८ पुरुष व ५५ महिला कैदी आहेत.  येथे  एका अंडासेल सह चार बॅरेक्स आणि एक महिलांसाठीचे बॅरेक आहेत. शिवाय एक दवाखानाही आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या बातम्या येऊ लागताच कारागृह प्रशासनाने बाहेरुन आत येण्यासाठीचे प्रवेश बंद केले आहेत. आत येणाऱ्या व्यक्तीचे हात धुण्याची, सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदीजनांना भेटायला येणाऱ्या नातेवाईकांनाही आत येण्यास मनाई करण्यात आली आहे. इतकेच काय पण न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या कैद्यांच्या न्यायालयात हजेरी देण्यासाठी, न्यायालयीन कामकाजासाठी  व्हिडीओ कॉन्फरन्सचा वापर केला जात आहे.
प्रत्येक कैद्याला मास्क देण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे मास्क हे स्वतः कैदी बनवत आहे.  कैद्यांनी बनवलेले मास्क शासकीय कर्मचारी, पोलिसांनाही देण्यात येणार असल्याचे अधिक्षक सदाफुले यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्क देण्यात आला आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात त्यांना हात धुण्यासाठी साबण व पाण्याची सोय आहे. यामुळे सर्व कैद्यांची प्रकृती उत्तम आहे. कैद्यांच्या दैनंदिन वापराचे कपडे, अंथरुण आदी कपडे धुण्यासाठी गरम पाणी व साबण इ. ची व्यवस्था करुन धुवून उन्हात वाळवून मग पुन्हा वापरता येत आहेत. एकाच आवारात अधिक व्यक्ती राहत असल्याने, ही खबरदारी राखली जात आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ