जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू


अकोला,दि.२३ (जिमाका)- कोरना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज संचारबंदी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात ३१ तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात आता व्यक्तींच्या मुक्त संचारास बंदी घालण्यात आली आहे. आज सायंकाळी जारी केलेल्या या आदेशानुसार, जिल्ह्यातील ग्रामिण व शहरी भागात  कोणतेही खाजगी, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेणे, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजन, क्रीडा इ. कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आली आहे.  सर्व दुकाने, आस्थापना,  खाजगी, राज्य परिवहन महामंडळाची वाहने,  ट्रॅव्हल बसेस, खाजगी चारचाकी वाहने चालविण्यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशातून  शासकीय, निम्शासकीय कार्यालये, अत्यावश्यक सेवेतील पॅथोलॉजी प्रयोगशाळा, रुग्णालये, दवाखाने, ए.टी. एम. बॅंक वित्तीय संस्था, गॅस एजन्सी,  दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते,  प्रसारमाध्यमांचे व्यक्ती व कर्मचारी  अत्यावश्यक सेवा देणारे सर्व घटक उदा. पाणीपुरवठा, विज, दूरसंचार सेवा इ. वगळण्यात आले आहेत. हे आदेश आज सायंकाळी उशीरा जारी करण्यात आले असून  या आदेशाचा भंग झाल्यास भारतीय दंड संहिता १९६० चे ४५ कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ