जिल्ह्यातील सर्व मनाई आदेशांना १४ एप्रिल पर्यंत मुदत वाढ


अकोला,दि.३१ (जिमाका)- कोरना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  दि.२४ रोजी मनाई आदेश जारी करुन संचारबंदी लागू केली होती. त्याशिवाय प्रतिबंधात्मकउपाययोजना म्हणूनही विविध घटकांना बंदी जाहीर केली होती. त्या सर्व मनाई आदेशांना १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आज निर्गमित केले. त्यानुसार, जिल्ह्यात १४ एप्रिलपर्यंत कलम १४४ लागू करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या आदेशाचा भंग झाल्यास भारतीय दंड संहिता १९६० चे ४५ कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ