पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

व्हीबी-जीराम जीअंतर्गत आढावा रोहयोमध्ये अधिकाधिक कामांना चालना द्यावी - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    व्हीबी-जीराम जीअंतर्गत आढावा रोहयोमध्ये अधिकाधिक कामांना चालना द्यावी -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २ : जिल्ह्यातील प्रत्येक गावात व्हीबी-जीराम जी योजनेत कामांना चालना द्यावी जेणेकरून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होईल, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांनी रोजगार हमी योजनेतील तालुकानिहाय मजूरांची उपस्थितीचा व कामांचा आढावा बैठकीद्वारे घेतला. रोहयो उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपवनसंरक्षक सुमंत सोळंके, वनाधिकारी, कृषी अधिकारी हे सभागृहात व सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. जिल्ह्यात आजमितीला व्हीबी-जीराम जी योजनेत २ हजार ३४२ कामे सुरू असून, ९ हजार १२५ मजूर उपस्थिती आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावांची गरज ओळखून अधिकाधिक कामे प्रस्तावित करावी व त्यांना तत्काळ चालना द्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. शेतात किंवा मोकळ्या जागेवर उताराच्या ठिकाणी पाणी जमिनीत खोलवर मुरवण्यासाठी   जलतारा योजनेतून शोषखड्डे ...