केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे आवाहन


अकोला,दि.२५ (जिमाका)-  केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की, देशात लागू करण्यात आलेली संचार बंदी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आहे. केवळ एकमेकांचा संपर्क टाळणे हाच हा संसर्ग टाळण्याचा उपाय आहे. तरी लोकांनी घरातच रहावे. आपल्यासाठी सर्व जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे घरातील शक्यतो एकाच व्यक्तीने जवळच्या ठिकाणी जाऊन घराला लागणाऱ्या अन्न धान्य भाजीपाला आदी वस्तू आणाव्या व नंतर घरातच थांबावे, असे आवाहन ना. धोत्रे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना