सुटीच्या दिवशीही ऑन ड्युटी


अकोला,दि.२५ (जिमाका)-  जिल्ह्यात संचारबंदी असतांना व आज गुढी पाडवा मराठी नववर्षारंभाची सुटी असतांनाही जिल्हाधिकारी स्वतः, निवासी उपजिल्हाधिकारी , आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे वैद्यकीय व पोलीस दलाच्या सोबतीने काम करत होते.   स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी तब्बल साडेतीनशे हून अधिक जणांचे कॉल्स स्विकारुन त्यांच्या अडचणी दूर केल्या. शिवाय अन्य प्रशासकीय कामकाज व परिस्थितीचा आढावा घेणे सुरुच होते. त्यात लोकांचे विविध अडचणी दूर करण्यासाठी यंत्रणेला सुचना देणे सुरु होते. सायंकाळी उशीरापर्यंत हे काम सुरु होते. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयही कार्यरत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*