अखेर ‘त्या’ तिघांची नावे प्रशासनाकडून जाहीर


अकोला,दि.२०(जिमाका)- केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून प्राप्त यादीनुसार, अकोला जिल्ह्यात विदेशातून ६२ प्रवासी दाखल झाले होते. त्यापैकी ५९ प्रवासी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आले.  तिघा जणांशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांनी अद्यापही जिल्हा प्रशासनाशी संपर्क केलेला नाही वा काहीही कळविलेले नाही.  तथापी, त्यांचा संपर्क व्हावा व त्यांची तपासणी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाने आज या तिघांची नावे जाहीर केली आहेत.  त्यात  पटेल जलपाल पंकज हे ह्युस्टन मधून आलेले, शुभम तिवारी हे इंडोनेशियातून आलेले आणि रितेश (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे शारजाह हून आलेले  तिघे प्रवासी आहेत. या व्यक्तिंना ओळखणारे अथवा त्यांचे कुटूंबिय नातेवाईक यांनी तात्काळ त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
                        दरम्यान आज अखेर दाखल ५९ प्रवाशांपैकी ४२ जण गृह अलगीकरण करुन निरीक्षणात आहेत.  १७ जणांचे निरीक्षणाचे १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशी माहितीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ