‘जनता कर्फ्यु’ तील सहभागाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आभार


अकोला,दि.२२ (जिमाका)- जिल्ह्यातमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील लोक जनता कर्फ्युमध्ये सहभागी झाले. जनतेच्या या प्रतिसादाबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. जिल्ह्यात जनता कर्फ्युला चांगला प्रतिसाद मिळाला.  सर्व व्यवहार पूर्णतः बंद होते. तसेच रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून आला. जिल्ह्याच्या मुख्यालयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद दलाचे नियंत्रण कक्ष , तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व त्यांची टिम जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता लोकांनी टाळ्या, थाळ्या व घंटानाद करुन प्रतिसाद दिला.
                        जनतेने याच प्रमाणे ३१ तारखेपर्यंत प्रतिसाद द्यावा, आपल्या घरातच थांबावे,  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच उपाय आहे, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ