स्वस्तधान्य दुकानांत एप्रिल मध्येच उपलब्ध होईल तीन महिन्याचे धान्य


अकोला,दि.२४ (जिमाका)- जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी ३१ तारखेपर्यंत संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील लोकांना वेळेवर धान्य व साखर व अन्य नियतन उपलब्ध व्हावे यासाठी येत्या एप्रिल महिन्यात  तीन महिन्याचे नियतन उपलब्ध करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरवठा शाखेला दिले आहेत. जिल्ह्यात तिन महिने पुरेल इतके धान्य व अन्य आवश्यक सामुग्रीची उपलब्धता आहे असे पुरवठा शाखेने स्पष्ट केले आहे. हे धान्य वितरण सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ