४२ पैकी ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह; अकरा प्रलंबित


अकोला,दि.३१ (जिमाका)-  जिल्ह्यात आज सायं. पाच वा. अखेर एकही कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण नाही. आजअखेर अकरा जण सदृष्य लक्षणांमुळे दाखल झाले आहेत. त्यात आजच दाखल झालेल्या दोघांचा समावेश आहे. दरम्यान आजपर्यंत दाखल ४२ जणांपैकी ३१ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणि आज दाखल झालेले दोघे व अन्य नऊ असे अकरा जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत विदेशातून आलेल्या १५१ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ५१ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. तर ९० जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर नऊ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ