वातानुकूलन यंत्राचा किमान वापर करण्याची सुचना


अकोला,दि.१९(जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी  व फैलावाला अटकाव करण्यासाठी वातानुकुलन यंत्राचा वापर कमीत कमी करावा, अशा सुचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत.
या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी  श्वसन संस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्तीकडून संसर्ग न होण्याची काळजी घेणे, शिंकतांना , खोकतांना नाका तोंडावर रुमाल अथवा टिश्युपेपर धरणे,  अर्धवट कच्चे शिजलेले मांस न खाणे,  फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.
याशिवाय हा विषाणू  मुख्यत्वे खोकला व शिंकण्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून पसरतो. ज्या भागात वातानुकूलन यंत्र बसविण्यात आले आहेत तेथे हे थेंब अधिक काळ राहतात. जेथे वातानुकूलन यंत्र नसेल तेथे हे थेंब लवकर सुकून विषाणूचा जीवन कालावधी कमी होतो व प्रसारास प्रतिबंध होतो. यासंदर्भात सर्व शासकीय कार्यालयांनी वा अन्य नागरिकांनी वातानुकूलन यंत्रणा कमीत कमी वापरावी अथवा वापरु नये. आपल्या जागेची दारे, खिडक्या उघडून वायुविजन होऊ द्यावे, असे प्रतिबंधात्मक उपाय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सुचविण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ