अकोला येथे 16 रोजी डाक अदालत
अकोला,दि.4 (जिमाका)- डाक सेवेबद्दल ग्राहकांच्या असणा-या तक्रारींचे निराकरण
करण्यासाठी सोमवार दि. 16 रोजी अकोला येथील
मुख्य टपाल कार्यालयात डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
डाक सेवेतील टपाल ,स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक, मनीऑर्डर या प्रकारच्या सेवांबाबत केलेल्या तक्रारीस जर सहा आठवड्यापेक्षा
अधिक काळ उत्तर न मिळाल्यास अशा तक्रारींच्या निवारणासाठी डाक अदालत आयोजीत
करण्यात आली आहे. ही डाक अदालत सोमवार दि.
16 रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधिक्षक डाकघर, अकोला विभाग , सिव्हिल लाईन्स, अकोला येथे होणार आहे.
या डाक अदालतील आपल्या तक्रारी अर्ज, सोबत मुळ तक्रारीची प्रत, ज्या अधिका-याकडे तक्रार दाखल केली त्याचा हुद्दा, व दाखल केल्याची
तारीख द्यावी, एका अर्जासोबत एकच तक्रार असावी,
अर्जदाराने आपली तक्रार प्रवर अधिक्षक डाकघर
अकोला विभाग सिव्हिल लाईन्स, अकेाला-
444001 या पत्त्यावर 15 तारखेपुर्वी समक्ष अथवा टपालाने पाठवावी, असे आवाहन प्रवर अधिक्षक
डाकघर, अकोला विभाग, अकोला यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा