पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचे आवाहन


अकोला,दि.२५ (जिमाका)-  राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले आहे की, लागू करण्यात आलेली संचारबंदी ही कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आहे. आपण आपल्या घरातच बसून हा संसर्ग रोखू शकतो. ज्या प्रमाणे सिमेवर युद्ध लढले जाते त्याप्रमाणे हे युद्ध आपल्याला  घरात बसून लढायचे आहे. घरात बसतांना सैनिकांचा विचार करा ते गोठवणाऱ्या थंडीत आणि कमाल उष्ण तापमानातही सिमेवर थांबतात, आपल्याला तर घरातच थांबावयाचे आहे. कुणाच्याही संपर्कात येऊ नका, असे आवाहन ना. कडू यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा