विशेष सहाय्य अनुदान; हयातीचे प्रमाणपत्र बंधनकारक


        अकोला,दि. १२ (जिमाका)-   समाजातील गोर-गरीब, निराधार, वयोवृद्ध , व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. सध्या या योजनेअंतर्गत  अनुदानाचा  लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी येत्या आर्थ‍िक वर्षात अनुदान   सुरळीत ठेवण्यासाठी हयातीचे   प्रमाणपत्र देणे बंधनकारक  आहे. तसेच सोबत सन २०१९-२० या आर्थ‍िक  वर्षातील उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड संबंधीत तहसिलदार कचेरीत मंगळवार दि. ३१  पर्यंत सादर करणे बंधनकारक  आहे, असे  संगायो  तहसिलदार डॉ. आर. पी. वानखेडे यांनी कळविले आहे.
            या योजनेच्या लाभार्थ्यांनी  वेळेत हयातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड दाखल न केल्यास २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. सर्व लाभार्थ्यांनी आपल्याला मिळणाऱ्या  लाभाची रक्कम संपूर्ण मिळत आहे  किंवा नाही याची खात्री करावी. अनुदानातुन रक्कम कपात होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित तहसिल कार्यालयाच्या निदर्शनास आणावे, असे आवाहन ही करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ