रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात १०१ चाचण्या, दोन पॉझिटिव्ह

 अकोला,दि.१४ (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या १०१ चाचण्या झाल्या त्यात दोन  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

आज दिवसभरात अकोट येथे १९ चाचण्या झाल्या त्यापैकी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, बार्शी टाकळी येथे तीन चाचण्या होऊन एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर  तेल्हारा येथे २३, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचारी २४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २३, हेडगेवार लॅब येथे पाच याप्रमाणे चाचण्या झाल्या. त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात २७ हजार ०४१ रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी १८६१ पॉझिटीव्ह आले आहेत,  असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना