सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

 अकोला,दि.२९ (जिमाका)- जिल्ह्याकरीता जानेवारी २०२१ करीता लक्ष्यनिर्धारित  सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य / नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचे परिमाण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

 वाटप परिमाणे व दर याप्रमाणे-

प्राधान्य गटातील लाभार्थ्यांना गहू- प्रति व्यक्ती  तीन किलो (दोन रुपये प्रति किलो), प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ- प्रति व्यक्ती दोन किलो (तीन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना गहू- १५ किलो प्रति कार्ड ( दोन रुपये प्रति किलो), अंत्योदय योजना तांदूळ- २० किलो प्रति कार्ड ( तीन रुपये प्रति कार्ड),  एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना गहू – चार किलो प्रति व्यक्ती(दोन रुपये प्रति किलो),  एपीएल शेतकरी कुटूंब लाभार्थ्यांना तांदूळ – एक किलो प्रति व्यक्ती (तीन रुपये प्रति किलो), नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता- एक किलो प्रति शिधापत्रिका (वीस रुपये प्रति किलो). या प्रमाणे परिमाण उपलब्ध झाले असून वाटप परिमाण गोदामातील साठा व लाभार्थी संख्या उपलब्धतेनुसार राहील असेही जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ