१९५ अहवाल प्राप्त; १७ पॉझिटीव्ह,१३१ डिस्चार्ज व एकाचा मृत्यू

 अकोला,दि. २६(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १९५ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७८ अहवाल निगेटीव्ह तर १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर १३१ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान एका रुग्णाचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.२५) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  १०३३३(८२९४+१८६२+१७७) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण  ६८५४२ जणांचे  अहवाल आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६६९०९ फेरतपासणीचे २७७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३५६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६८४५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६०१६५ तर पॉझिटीव्ह अहवाल १०३३३ (८२९४+१८६२+१७७)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज १७ पॉझिटिव्ह

आज सकाळी  १७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व नऊ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील तीन जण खडकी येथील,  दोन जण मोठी उमरी येथील तर उर्वरीत कंगरवाडी, कावासा, जुने शहर, खोलेश्वर, दुर्गा चौक, टॉवर चौक,  आळशी  प्लॉट,  मुर्तिजापूर, दानापूर ता. तेल्हारा,  बार्शी टाकळी, देशमुख फाईल आणि मुर्तिजापूर रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळी एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

दरम्यान काल (दि.२५)रॅपिड ॲटीजेन चाचण्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत करण्यात  आला आहे, याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज खाजगी हॉस्पिटल येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. हे गृहस्थ ८० वर्षीय पुरुष असून मोहिते प्लॉट, अकोला रहिवासी आहे. त्यांना १९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.

१३१ जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १४, बिहाडे हॉस्पिटल येथून  तीन, आयकॉन हॉस्पिटल येथुन तीन, हॉटेल स्कायलार्क येथून दोन, ओझोन हॉस्पिटल येथून एक व हॉटेल रिजेन्सी  येथून  दोन  तर होम क्वारंटाईन असलेले १०६ अशा १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

५२३ रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १०३३३(८२९४+१८६२+१७७)आहे. त्यातील ३१६ जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची ९४९४ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत ५२३ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ