रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 115 चाचण्या,एक पॉझिटिव्ह
अकोला,दि.23 (जिमाका)- कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात
झालेल्या 115 चाचण्या झाल्या त्यात एक अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज
दिवसभरात अकोट येथे 44, बाळापूर येथे एक, तेल्हारा येथे 17, अकोला
आयएमए येथे सात, आरोग्य कर्मचारी येथे 21, तर हेगडेवार लॅब
येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणीही पॉझिटीव्ह आले नाही. तसेच
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 23 चाचण्या होऊन एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला, आतापर्यंत
जिल्ह्यात 28 हजार 144 रॅपिड ॲन्टीजेन चाचण्या झाल्या त्यापैकी 1902
पॉझिटीव्ह आले आहेत, असे
जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा